: जुन्या जालन्याच्या भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गेलेल्या चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ( )

वाचा:

सुभाष पितांबरे, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत नाईक आणि विष्णू नाईकनवरे अशी या नागरिकांची नावे आहेत. ते बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी निवासस्थान येथे गेले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून, ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा:

नेमकं काय घडलं?

जुन्या जालन्यातील शिवनगर भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नाही. या भागात नगरपालिका पाणीपुरवठा करते मात्र पाणीच येत नसल्याने नागरिक त्रस्त होते. त्यामुळे नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना जाब विचारायचे ठरवले. त्यानुसार सुभाष पितांबरे, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत नाईक आणि विष्णू नाईकनवरे हे बुधवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास थेट जिल्हाधिकाऱ्यंच्या घरी दाखल झाले. तिथे या चौघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here