नवी दिल्लीः देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू ( ) आहे. पण अनेक राज्यांना लसीच्या तुटवड्याचा ( ) सामना करावा लागतोय. दिल्ली, महाराष्ट्रात अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. लसीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष काँग्रेस सतत केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सवाल उपस्थित करत आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ( ) यांनी बुधवारी लांबलचक फेसबुस पोस्ट लिहून करोनावरी लसीच्या तुटवड्यावरून ( ) केंद्रावर हल्लाबोल केला. ‘जबाबदार कोण?’ या शिर्षकाखाली त्यांनी काही तथ्य मांडत सरकारला तीन प्रश्न केले आहेत. ‘लसीवर आता फक्त मोदीजींचा फोटो आहे. पण सर्व जबाबदारी मात्र राज्यांवर देण्यात आली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री लसींच्या तुटवड्यावर केंद्र सरकारला सूचना देत आहेत’, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

भारताच्या १३० कोटी जनतेपैकी ११ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि फक्त ३ टक्के नागरिकांना दोन डोस मिळाले आहेत. मोदीजींच्या ‘टीका उत्सव’च्या घोषणेनंतर गेल्या एक महिन्यात लसीकरणात ८३ टक्के घट झाली आहे. मोदी सरकारने आज देशाला लसीच्या तुटवड्याच्या दलदलीत ढकललं आहे. लसीच्या तुटवड्यामागे सरकारचे लसीकरण धोरणातील अपयश समोर आले आहे. याला जबाबदार कोण आहे? असा सवाल प्रियांका गांधींनी केला.

करोना संसर्गाच्या सुरवातीला भारतात सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी लसीचा शस्त्र म्हणून उपयोग करण्याऐवजी त्याचा वैयक्तीक प्रचारासाठी वापर केला गेला. यामुळे देशातील लसींचा सर्वात मोठा उत्पादक असलेला देश हा इतर देशांच्या लसींच्या दानावर अवलंबून आहे. लसीकरणाच्या स्तरावर जागातील कमकुवत देशांच्या यादी भारताचा समावेश झाला आहे. हेच आजचे कटू सत्य आहे. असं का झालं?, असं प्रियांका गांधींनी विचारलं.

प्रियांका गांधींचे प्रश्न…

– सरकारने गेल्या १ वर्षांपासून लसीकरणाचे नियोजन केले होते. मग जानेवारी २०२१ मध्ये १ कोटी ६० लाख लसींच्या डोसची ऑर्डर का दिली गेली?

– सरकारने नागरिकांना कमी लस देऊन, लसीचे अधिक डोस हे विदेशात का पाठवले?

– भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. पण आज दुसऱ्यांच्या देशांकडून लस मागण्याची वेळ का आली? आणि तेही मोठी कामगिरी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न का केला जात आहे?

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here