मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलचा अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात करोनावरील रुग्णांच्या उपचारात उपयोग केला जातोय. संसर्गाच्या पहिल्या ७ दिवसांत ७० ते ८० टक्के नागरिक ज्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडत होती. पण अशा रुग्णांना कॉकटेलचा डोस दिल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडत नाहीए, असं डॉक्टर त्रेहान यांनी सांगितलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.
मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर सत्य प्रकाश यादव यांनीही यासंदर्भात ट्वीट केलंय. अखेर करोनावरील उपचारासाठी अँटीबॉडी कॉकटेल बाजारात उपलब्ध झाले आहे. यामुळे कोविड संसर्ग झालेल्या ८४ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. आता करोनाच्या इतर रुग्णांना बरे करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलने उपचार केलेल्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्याच्यावर घरी देखरेख ठेवली जाईल, असं डॉ. त्रेहन यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times