नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या १४००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या फरार उद्योजक मेहुल चोक्सीला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी चोक्सीने अॅंटिग्वामधून पळ काढला होता मात्र तीन दिवसांनंतर डॉमनिकामध्ये त्याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे.

अॅंटिग्वामधून रविवारी पळाला होता. अँटिग्वा पोलिसांनी चोक्सीची शोध मोहीम सुरु केली होती. तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. मात्र डॉमनिकामध्ये पोलिसांनी चोक्सीला अटक केली आहे. दि अँटिग्वा न्यूज रुम या वृत्त एजन्सीच्या वृत्तानुसार मेहुल चोक्सी सध्या डॉमनिका पोलिसांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंटच्या (सीआयडी) कस्टडीमध्ये आहे.

पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८ मध्ये मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांनी भारतातून पलायन केले होते. चोक्सी कॅरेबियन देश अॅंटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून होता. मात्र अॅंटिग्वान्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चोक्सी रविवारपासून बेपत्ता झाला होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलीसांनी चोक्सीचा शोध सुरु केला होता. आज तीन दिवसांनी पोलिसांना चोक्सीला पकडण्यात यश आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here