म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीत महागाईही वाढत आहे. इंधनासह तेलाचेही दर वाढत असल्याने भाजी, फळांच्या किंमतीही वाढत आहेत. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांसाठी म्हणून पुरविण्यात येणाऱ्या भाज्याफळांच्या दरांसाठी सादर केलेल्या निविदेत स्वस्ताई अवतरली आहे. सर्वात कमी निविदाकार कंत्राटदारांनी कोबी ८.६६ रु., कांदे १६ रु., टॉमेटो २२ रु., बटाटे २३ रु. केळी १५ रु. तोंडली १३ रु., सिमला मिरची १६.७० रु., चवळी २०.७१ रु. आदी दराने पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.

पालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना उपचाराप्रमाणेच सकस आहार मिळण्यासाठी फळे, भाज्यांचाही पुरवठा केला जातो. त्यासाठी पालिकेने मागविलेल्या निविदांपैकी भाजी, फळांसाठी प्रत्येकी एक-एक कंत्राटदाराच्या निविदांना अनुकूलता दर्शविली आहे. मात्र, त्या पुरवठ्यातील दर हे कमालीचे कमी असूनही सकस, उत्तम पद्धतीचा पुरवठा कसा करणार, याचे उत्तर समजू शकलेले नाही. यापूर्वीही कमी दराचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. आता पूर्वीपेक्षा थोडी रक्कम वाढवून नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या दोन्ही पुरवठ्यासाठी १ कोटी ११ लाख रुपये मोजले जाणार आहे. हे प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत सादर होणार आहेत.

पालिकेच्या प्रस्तावानुसार, १६ रुपये किलोने ३५ हजार किलो कांदे, १४ रुपये किलोने ५ हजार प्रतिकिलो फ्लॉवर, ९ रुपये किलो दराने १५ हजार किलो काकडी मागवल्या आहेत. भाज्यांच्या पुरवठ्यात १५ प्रकारच्या भाजीपाल्यासह बटाटे, मिरच्या, लिंबू, टॉमेटो, कच्चे टॉमेटो, आदींचा समावेश आहे. त्यापैकी काहींच्या किंमती गेल्यावेळच्या खरेदीपेक्षा २६ पैशांपासून ते ८ रुपयांपर्यंत अधिक आहेत. मात्र, तरीही हे दर सध्याच्या बाजारभावापेक्षा रास्त असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यात, एकूण ४० प्रकारच्या भाजीपाला पुरवठ्यासह फळांचा समावेश आहे.

किती प्रमाणात खरेदी?
पालिकेकडून केल्या जाणाऱ्या खरेदीचे प्रमाणही प्रचंड आहे. केळी-१ लाख ७० हजार किलो, बटाटे-५०,००० किलो, लाल भोपळा-३५,००० किलो, कांदे-३५,००० किलो, मोसंबी ३२ हजार किलो, नारळ-२७,००० नग, दोडके-२५,००० किलो, दुधी-२४,००० किलो, वांगी-१६ हजार किलो, पडवळ-१६ हजार किलो, रताळे-१०,००० किलो, सुरण-१०,००० किलो, भेंडी-४ हजार किलो आदींचा समावेश आहे.

जिन्नस-आताचे दर-गेल्यावेळचे दर

(प्रति किलो)

बटाटे २२.७७ रु.-१५.५० रु.

लाल टॉमेटो २१.९६ रु.-१८ रु.

कांदे १५.९९ रु.-१६.२९ रु.

कोबी ८.६६ रु.-९.१० रु.

भेंडी १६.७६ रु.- १७.९१ रु.

लाल भोपळा ५.८४ रु.- ६.१० रु.

फ्लॉवर १३.९५ रु.- १४.४९ रु.

केळी १५.१०रु. – १५.४५ रु.

तोंडली १३ रु.१३.९५ रु.

सिमला मिरची १६.७०रु.- १६.९० रु.

कांद्याची पात २०.७० रु. – २०.९७ रु.

चवळी २०.७० रु.- १८.५४ रु.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here