म. टा. विशेष प्रतिनिधी,

‘मुंबईतील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कडक निर्बंध शिथिल करणे हे म्हणजे करोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे’, असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री यांनी बुधवारी केले. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या कमी होत असल्याने १ जूनपासून निर्बंध शिथिल होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता मुंबईतील निर्बंध आणखी काही काळ लांबण्याचे संकेत मिळत आहेत.

अस्लम शेख बुधवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. साहजिकच करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. आता करोना रुग्णांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून तसेच सर्वसामान्यांकडूनही होत आहे. राज्य सरकारनेही १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्याबाबत चाचपणी सुरू केली होती. मात्र आता शेख यांच्या या विधानामुळे निर्बध शिथिल होतील की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

‘टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे गरजेचे’

अस्लम शेख म्हणाले की, ‘मुंबईतील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत लॉकडाउन उठवणे हे म्हणजे करोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उठवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. सलून, हार्डवेअर आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सुरूवातीला उघडावीत. त्यानंतर बाकीची दुकाने आणि इतर दैनंदिन व्यवहार सुरू व्हावेत’, असे मतही त्यांनी मांडले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here