मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री यांनी पंडितजींना अभिवादन केलं आहे. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांचा या देशामध्ये कायमच सन्मान होत राहिला व यापुढंही होत राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. या निमित्तानं जयंत पाटील यांनी माजी पंतप्रधान यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करून भारतीय जनता पक्षाला चिमटा काढला आहे.

‘गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. या देशामध्ये पंडितजींचा सन्मान होत राहिला आहे व यापुढंही होत राहील,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे देशाच्या संसदेचे सदस्य होते. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी भाषणात म्हटलं होतं की, ‘भय व भूकमुक्त जगाचं एक स्वप्न उद्ध्वस्त झालं आहे. भारतमाता आज शोकानं भरून गेली आहे, भारतमातेनं तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचं प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे.’ जयंत पाटील यांनी वाजपेयींच्या त्या भाषणाची आठवण करून देत भाजपाला चिमटा काढला आहे.

१९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असं सांगत, जयंत पाटील यांनी वाजपेयींच्या त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.

‘पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसंच, लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here