मुंबईः राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारमधील मंत्र्यांमध्ये झालेल्या खडाजंगीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसंच, पदोन्नतीच्या मुद्द्यावरुनही सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. यावरुन मनसेनं ठाकरे सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मनसेचे नेते यांनी एक ट्वीट करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. संदीप देशपांडे हे सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करत असताता. यावेळीही त्यांच्या या ट्वीटची चर्चा होत आहे.

‘करोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी नाही तर सरकार वाचवण्यासाठी होममध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे, अशी चर्चा आहे. कितपत खरे ते त्या देवालाच ठाऊक,’ असं खोचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

शरद पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार टिकवणे केवळ शिवसेनेची जबाबदारी नाही, असं म्हणत नाराजी व्यक्त केल्याचं खात्रीलायक सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळं संदीप देशपांडे यांच्या या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here