संभाजीराजे यांनी आज सकाळी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे त्यांची भेट घेतली. संभाजीराजे व पवारांमध्ये १५ मिनिटं चर्चा झाली. या नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती संभाजीराजेंनी पवारांना केली आहे.
‘तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. सर्व नेत्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
‘मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे, असं संभाजीराजेंनी पवारांना म्हटलं असून त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसंच, आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार आहे,’ असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times