प्रतिनिधी ।

एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना तब्बल १८ दिवसानंतर मंगळवारी उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी हा अद्यापही फरार आहे. शेख नजीर शेख उस्मान वय (५० वर्षे, राहणार कांचीपुरा ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

उमरखेड शहरातील कांचीपुरा येथील शेख नजीर शेख उस्मान याचा दूध व्यवसाय आहे. त्यांच्या गोठ्यात २० ते २५ म्हशी आहेत. त्यामुळं तो दररोज गोठ्यातच असायचा. पीडित मुलगी दूध आणण्याकरिता शेख नजीर शेख उस्मानच्या गोठ्यात गेली असता त्याने आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. काही तरुणांच्या जमाव रात्रीच्या सुमारास शेख नजीर शेख उस्मान यांच्या घरावर चाल करून गेल्याची चर्चा शहरात सुरू झाली.

वाचा:

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी, २६ मे रोजी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीला अटक करण्याची मागणी मागणी केली आहे. आरोपीला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर जमाव धडकला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करू, असे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अन्यथा, पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करणार

आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा एमआयएमनं दिला आहे. येत्या तीन दिवसात आरोपी अटक न झाल्यास उमरखेड पोलिस ठाण्यासमोर वार्डातील नागरिकांसह उपोषणाला बसू, असं एमआयएमचे नगरसेवक अफसरभाई जलील कुरेशी यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here