लोकांचे प्राण महत्वाचे असून मागचा लॉकडाउन हटवल्यानंतर करोना बाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले. आता राज्यात करोना बाधितांची संख्या नक्कीच कमी होतेय, मात्र लगेचच सर्व सुरू होईल, असेही नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आपल्याला जसजसा लशीचा पुरवठा होत आहे, तस तसे लसीकरणही होत आहे, असे सांगतानाच चिंता करू नका, गर्दी करू नका, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
मुंबईतील करोना संसर्ग देखील नियंत्रणात आला असल्याचे दिसत आहे. मात्र मुंबईतील रुग्ण पूर्ण कसे घटतील याकडे सध्या आम्ही लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत अजूनही १३०० ते १४०० रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या पूर्णपणे कशी कमी होईल हा आमचा प्रयत्न असणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मागच्या वेळी जेव्हा लॉकडाउन हटवण्यात आला, तेव्हा ११ हजारांच्या आसपास रुग्णसंख्या होती. यावेळी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. लॉकडाउन उघडणार की पुढे चालू राहणार याबाबत आत्ताच काही सांगू शकणार नाही, मात्र लॉकडाउन शिथील झाला तरी देखील लगेचच सगळे काही सुरू होईल असे होणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय १३ मे रोजी घेतला होता. सध्याचे निर्बंध १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times