मुंबई: हिंदी ‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वाची प्रचंड चर्चा झाली. काही तासांतच या पर्वाचा विजेचा घोषित होणार असून कोण होणार या पर्वाचा ‘बिग बॉस’ याकडं सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या वादामुळं आणि कारणामुळं हे पर्व चर्चेत राहिलं आहे. या पर्वाचा अंतिम सोहळा लवकरच सुरू होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पाहुयात या सोहळ्याचे ताजे अपडेट्स…

बिग बॉस १३ च्या ट्रॉफीचा लुक
बिग बॉस १३ ची ट्रॉफी फार सुंदर आहे. ट्रॉफीमध्ये सीझन १३ च्या लोगोप्रमाणे BBचं साइन तयार करण्यात आलं आहे. BB च्या चारही बाजूंना डायमण्ड लावण्यात आले आहेत. तसेच ट्रॉफीला निळ्या रंगाचं बॅकग्राउंड देण्यात आलं आहे. गेल्या सीझनच्या ट्रॉफीपेक्षा १३ व्या सीझनची ट्रॉफी पूर्ण वेगळी आहे. आता १५ फेब्रुवारीला ही ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार ते कळेल.

> सिद्धार्थ शुक्ला ठरला ‘बिग बॉस १३’चा विजेता

> सिद्धार्थ, असिम दोघेही स्टेजवर…सलमान करणार विजेत्याची घोषणा.

> शेवटचे काही क्षण…सिद्धार्थ की असिम याबाबत उत्कंठा…असिम झाला शर्टलेस!

> अंतिम टक्कर सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यात. १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन.

> शहनाझ गिलही बिग बॉसमधून बाहेर. बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात अनोखी स्पर्धक अशी पावती देत सलमानने दिला निरोप.

> बिग बॉसच्या घरात एवढा मोठा पल्ला गाठेन असे वाटले नव्हते: रश्मी देसाई

> शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज या तिघांमधून ठरणार विजेता.

> पारस, आरतीनंतर आता रश्मी देसाईलाही बिग बॉसच्या घरातून निरोप.

> बिग बॉस फिनालेच्या सेटवर दिग्दर्शक रोहित शेट्टीची ग्रॅण्ड एंट्री

> आता उरलेत शेवटचे चार स्पर्धक. उत्सुकता शिगेला.

> पारस छाब्रानंतर आरती सिंह बिग बॉसच्या घरातून आऊट.

> क्रिकेटपटू हरभजन सिंग, मोहम्मद कैफसोबत स्टेजवरच सलमान खेळला क्रिकेट.

> विजेता सोडून अंतिम चार रनर-अपसाठी सलमानने जाहीर केले विशेष गिफ्ट.

> पारस छाब्राने १० लाख रुपये घेऊन बिग बॉसला केला रामराम.

> घरातील एकेक सदस्य होणार बेघर. ज्याला जिंकण्याची शक्यता वाटत नाही तो १० लाख रुपये घेऊन घर सोडू शकतो. सलमानने दिली ऑफर.

> सलमानने घेतली शहनाझची फिरकी. सिद्धार्थ, बिग बॉसचा डोळा, ५० लाख रुपये आणि वर यापैकी काय निवडशील असं विचारलं असता मला ट्रॉफी हवी, असं शहनाझचं उत्तर.

> सलमान खानच्या धमाकेदार एंट्रीने झाली ग्रॅण्ड फिनालेची सुरुवात. शोमधील चटपटीत आठवणींना सलमानने दिला उजाळा.

> फिनालेच्या दिवशीही सिद्धार्थ आणि शहनाझ यांच्यात उडाले खटके.

>>सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यातील एखादा स्पर्धक विजेता होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

>>घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंग एवढेच कंटेस्टंट उरले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here