मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपसमितीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका असून ही भूमिका काँगेरेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चव्हाट्यावर आणल्याचेही चव्हाण यांनी टीका करताना म्हटले आहे. (congress leader criticizes bjp over )

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत भाजपवर हे टीकास्त्र सोडले आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा केवळ दिखाऊ असल्याची टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठाआरक्षणाबाबत भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा दिखाऊ असून, या मुद्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे.’

‘चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजात गैरसमज पसरवू नयेत’

मराठी आरक्षणाची ही वस्तुस्थिती असून ती लक्षात घेता भाजप व आमदार चंद्रकांत पाटील यांना माझे पुनःश्च आवाहन आहे की, कृपया मराठा समाजात गैरसमज निर्माण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, असे चव्हाण यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल ३१ मे पर्यंत अपेक्षित असून, त्यानंतर राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘भाजपने मराठाआरक्षण बाबत समाजाची दिशाभूल करू नये’
भाजपने मराठाआरक्षण बाबत समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन आम्ही वारंवार करतोय. पण दिशाभूल हाच त्यांचा एकमेव अजेंडा दिसतो आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी भाजपवर केली आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणतात, फेरविचार याचिकेसाठी ४ जून पर्यंतची मुदत आहे. पण ही वस्तुस्थिती नाही. कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश दिला नसल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here