पुणे : धामणी (ता. आंबेगाव ) इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन राजाराम जाधव ( वय ४२ ) यांचा खून करून मृतदेह आणि गाडी जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (ता २५ ) रात्री पोंदेवाडी इथं घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

व्यवसायाच्या आर्थिक देवाण-घेवाणीत हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात मंचर पोलिसांनी पाच ते सहा तासांच्या आत दोन आरोपींना जेरबंद केलं आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मंचर इथं बुधवारी रात्री ही माहिती दिली.

अधिक माहितीनुसार, धामणी इथल्या सचिन राजाराम जाधव मंगळवारी रात्री घरी न आल्यानं त्यांचा पुतण्या रोहन जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोंदेवाडी काठापुर रस्त्यालगत बुधवारी सकाळी नागरिकांना रक्ताचे शिंतोडे, चपलांचा जोड, कंगवा, आढळून आला स्थानिकांनी तत्काळ ही माहिती पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांना दिली.

याची माहिती मिळताच पोलिसांनी पोलीस अधीक्षक डा . अभिनव देशमुख अप्पर अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते, निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता खून झाल्याचा प्राथमिक अंदाज धरून तपास वेगाने फिरवला.

अखेर हा खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आणि त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. मुख्य आरोपी बाळशिराम थिटे, विजय सूर्यवंशी अशी अटक केलेल्यांची नावं असून इतर दोन आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितलं. तर अधिक तपास पोलीस सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here