राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. आता लवकरच याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘२०१५ साली एका समितीच्या अहवालानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर उलट परिणाम दिसू लागले होते. त्यानुसार जिल्हाभरात अवैध दारुविक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीकडे सुमारे अडीच लाख लोकांनी दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या समितीने दारुबंदी उठवण्याची शिफारस केली. या शिफारशीनंतरच राज्य सरकारने दारुबंदी उठवण्याचा निर्णय का घेतला, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times