मुंबई: ‘बिग बॉस’चं तेरावं पर्व अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जिंकलं आहे. सिद्धार्थ या पर्वात अनेक कारणांनी सर्वाधिक चर्चेत राहिला. मात्र, त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनातही त्याने स्थान मिळवलं आणि त्या जोरावरच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी उंचावली. यासोबतच सिद्धार्थ ४० लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचाही धनी ठरला आहे.

बिग बॉसच्या घरातून सर्वात आधी पारस छाब्राने संधी साधत काढता पाय घेतला. आपण जिंकू शकत नाही, असे ज्या स्पर्धकाला वाटते त्याने एक्झिट घेतल्यास १० लाख रुपये मिळतील, अशी ऑफर सलमानने दिली होती. ती पारसने स्वीकारली. पारस आऊट झाल्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात खऱ्या अर्थाने अंतिम फेरी रंगली. आरती, रश्मी देसाई, शहनाझ अशा क्रमाने स्पर्धक बाद झाले आणि अंतिम टक्कर सिद्धार्थ शुक्ला व असिम रियाज यांच्यात झाली. त्यात १५ मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली असता प्रेक्षकांनी भरभरून मते सिद्धार्थच्या पारड्यात टाकली आणि काही क्षणांतच त्याच्या जेतेपदावर सलमानने शिक्कामोर्तब केले.

‘बिग बॉस’चा अंतिम सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. बिग बॉसचा होस्ट सलमान खानने या सोहळ्यात रंग भरले. एकापेक्षा एक सरस अशा सादरीकरणासोबतच स्टेजवर अनेक स्टंट तर रंगलेच शिवाय हरभजन सिंग आणि मोहम्मद कैफसोबत सलमान थोडा क्रिकेटही खेळला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सोहळ्यात शेवटही तितकाच उत्कंठावर्धक राहिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here