मुंबई: राज्यात आज गुरुवारी २१ हजार २७३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ४२५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. (maharashtra registered 21273 new cases in a day with 34370 patients recovered and 425 deaths today)
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ७२ हजार १८० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १.६३ इतके आहे. सध्या राज्यात २२ लाख १८ हजार २७८ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १९ हजार ९९६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच ज्यांच्याव उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या ३ लाख १ हजार ४१ इतकी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times