नवी दिल्लीः भारत सरकार आणि सोशल मीडिया कंपनी ट्वीटरमध्ये खटके ( govt slams ) उडाले आहेत. भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त करणाऱ्या ट्वीटरला केंद्र सरकारने सणसणीत उत्तर दिलं आहे. ट्वीटरचा धमकावल्याचा आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा आहे. जगातील सर्वा त मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्नन करत आहे. जाणून बुजून सरकारच्या आदेशाचे पालन न करून कायद्या सुव्यवस्था दुबळी करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया कंपन्यांचे प्रतिनिधी भारतात सुरक्षित होते आणि पुढेही राहतील, असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्वीटरचे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्वीटरचे अलिकडील उत्तर हे ट्विटरचे अलीकडील विधान हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर आपल्या अटी लादण्याचा एक प्रयत्न आहे. कंपनी नियमांचे पालन करण्यास नकार देत आहे. यामुळे गुन्ह्यांच्या जबाबदारीपासून त्यांना सुरक्षा मिळते आहे. कंपनी आदेशाचे पालन न करता मुद्दाम भारताच्या कायदा व सुव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.

भारतात ट्वीटरचे मोठ्या संख्येत युजर आहेत. पण ट्विटर इंडियाचे अधिकारी म्हणतात, आपल्याला कोणतेही हक्क नाहीत. कोणत्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित केल्यावर ते अमेरिकेतील ट्विटर मुख्यालयाशी संपर्क साधण्यास सांगतात. कंपनीची युजरबद्दलची कथित वचनबद्धता खोटी असून फक्त आपल्या फायद्यासाठी विचार करत आहे, असं मंत्रालयाने म्हटलंय.

दिल्ली पोलिसांचाही ट्विटरला दणका

टूलकिट प्रकरणी ट्वीटरने दिलेले निवेदन हे खोटे आणि कायदेशीर तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे, अस दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना धमकावलं जात असल्याची रणनिती अवलंबत ट्वीटरने आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी ट्वीटरला हा दणका दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here