मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत यांनी राज्य सरकारचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली आहे. तसंच मनसे अध्यक्ष यांनाही टोला लगावला आहे.
खासदार यांनी मराठा आरक्षणाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून नारायण राणेंनी राज ठाकरे यांना चिमटे काढले आहेत. ‘म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात आता हे मुख्यमंत्र्यांना सांगणार का?’ असा टोला राणे यांनी राज ठाकरेंना लगावला. ‘मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत,’ असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंनाही कोपरखळी मारली.
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही, असं विधान काही दिवसांपूर्वी संभाजी राजे यांनी केलं होतं. यावर उत्तर देताना राणे म्हणाले की, ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असं बोलणं चुकीचं आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत त्यांनी काय केलं? शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलं? मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकार किती गंभीर आहे? स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मताचे नसल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
भ्रष्टाचाराचाही गंभीर आरोप
राज्य सरकारच्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवरून खासदार नारायण राणेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. या टेंडरमध्ये १२ टक्के पैसे ठेकेदाराकडे मागितल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा या ठेकेदाराकडे पैशाची मागणी झाली आणि त्यांनंतर हे टेंडर नको म्हणून सागंण्यात आलं. यांना लसी खरेदी करून रुग्णांना बरे करायचे नाही, तर हे पैसे कमवायला बसल्याचा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times