या हाणामारीबाबत मिळालेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या प्रभाग ७३ मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराशेजारी मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. तेथे मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कंत्राटदाराला त्यांनी विचारणा केली. त्याच वेळी त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेले.
क्लिक करा आणि वाचा-
प्रवीण मर्गज यांच्या डोळ्याला झाली दुखापत
मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजीव पिपळे यांनी माहिती देताना सांगितले की, या हाणामारीत मनसेचे नेते प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. हे भांडण आणखी वाढू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या मनसे आणि शिवेसनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times