गडचिरोली: गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रातील तरुणाईला देणाऱ्या ‘’ संस्थेने आजपासून हा कार्यक्रम यू-ट्यूबवर उपलब्ध करुन दिला आहे. प्रसिद्ध समाजसेविका तथा ‘सर्च’ संस्थेच्या संचालिका या स्वत: तरुण, तरुणींना मार्गदर्शन करणार आहेत. ( program of search is now available on youtube)

‘सर्च’ संस्थेच्या वतीने गेली ३० वर्षे डॉ.राणी बंग व त्यांचे सहकारी महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘तारुण्‌यभान’ हा ‘प्रेम, लैंगिकता व प्रजनन’ प्रबोधनाचा कार्यक्रम घेत आहेत. आजच्या तरुणाईने स्व-भान जोपासताना इतर नातेसंबंधांचे संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक संवर्धन करावे, त्यामुळे तरुणाई अधिक निरोगी व आनंदपूर्ण होईल, तसेच समाजातील लैंगिक गैरसमज, स्वैराचार व अत्याचाराला आळा बसेल, हा त्यामागचा हेतू होता.

क्लिक करा आणि वाचा-
मागील ३० वर्षांत सर्चच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वदूर पसरलेल्या जवळपास पाचशे शाळा, महाविद्यालयांमध्ये ५० हजार कुमारवयीन व तरुण मुला-मुलींच्या तीन दिवसीय शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या आहेत. आता हा कार्यक्रम युवांना सुलभरित्या उपलब्ध व्हावा म्हणून ‘निर्माण फॉर यूथ’ या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. २६ मेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक भाग ३० मिनिटांचा असणार आहे. दर आठवड्याला एक भाग यू-ट्यूबवर उपलब्ध होणार असून, डॉ.राणी बंग स्वत: वैद्यकीय ज्ञान व सामाजिक भान सांभाळून माहिती देणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here