रमेश सिप्पी यांना ‘जीवनगौरव’
तमाम हिंदी चित्रसृष्टी ज्या सुवर्णक्षणांची वाट पाहत होती, ते क्षण इंडस्ट्रीने रविवारी रात्री आसाममध्ये अनुभवले. निमित्त होते ते ‘६५ वा ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसाम’चे. फिल्मफेअरचा हा झगमगता सोहळा यंदा आसाममध्ये गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियममध्ये दणक्यात पार पडला. अवघ्या बॉलिवूडचं लक्ष लागून राहिलेल्या ‘६५ वा ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२०’ सोहळा विशेष लक्षवेधी ठरला तो दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि अभिनेता गोविंदा यांच्या गौरवामुळे! मनोरंजन सृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी ‘फिल्मफेअर’तर्फे रमेश सिप्पी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे अभिनेता गोविंदा यांना ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सोहळा खुलवला तो वरुण धवन, कार्तिक आर्यन, रणवीर सिंह आणि आयुषमान खुराना यंदाच्या धमाकेदार सादरीकरणाने. शाहरुख खान आणि सलमान खान यांनी नव्वदच्या दशकातील सिनेगीतांवर अफलातून नृत्य सादरीकरण केले. यंदा झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावून तब्बल १० फिल्मफेअर पुरस्कारांवर आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री म्हणून अनुक्रमने रणवीर सिंह आणि आलिया भट यांनी ब्लॅक लेडी उंचावली. करण जोहर आणि अभिनेता विकी कौशल यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२०ची संध्याकाळ अधिक रंगतदार झाली.
आज प्रक्षेपण
आज, १६ फेब्रुवारीला रात्रौ ९ वाजता पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण ‘कलर्स’ वाहिनीवर होणार आहे. सोबतच फिल्मफेअरच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर देखील या प्रक्षेपणाचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल.
फिल्मफेअर पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट चित्रपटः गली बॉय
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झाेया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती): आर्टीकल १५ आणि सोनचिरीया
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू, (सांड की आँख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती): आयुषमान खुराना, (आर्टीकल १५)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथाः अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, (आर्टिकल १५)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): अभिमन्नू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण): अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य धर, (उरी: दसर्जिकल स्ट्राइक)
सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी – अपना टाइम आयेगा (गली बॉय)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः अरिजीत सिंह – कलंक नही, (कलंक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः शिल्पा राव – घुंगरू (वॉर)
जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी
एक्सलन्स इन सिनेमा : गोविंदा
आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट : शाश्वत सचदेव (उरी)
६५ वा ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० @ऑसम आसामटायटल स्पॉन्सर : ॲमेझॉन.इनडेस्टिनेश पार्टनर : ऑसम आसामपॉवर्ड बाय स्पॉन्सर्स : जॉय ब्युटीफुल बाय नेचर, श्याम स्टील, विमल इलायची, बिकाजी अँड गॉर्स ग्रुप
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times