म. टा. प्रतिनिधी,

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करोना सदृश व आजाराने ग्रस्त असलेल्या शेतमजूर महिलेवर ऐतिहासिक पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे आज गुरूवारी पार पडली आहे. रुग्णालयात म्युकोरमायकोसिस आजाराच्या रुग्णावरील हि पहिलीच शस्त्रक्रिया होती. (the first successful in )

पाचोरा तालुक्यातील कोल्हे या गावात पाटील परिवार राहतो. कर्ता पुरुष पक्षाघात आजाराने घरीच असतात. तर महिला दुसऱ्या शेतात जाऊन मजुरी करते. पाटील दाम्पत्याचे तिन्ही मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील मोठी मुलगी हि कलाशाखेच्या द्वितीय वर्षात तर दोन मुले अनुक्रमे सहावी व पाचवीत आहे. त्यामुळे घराची जबाबदारी दोन्ही महिलांवरच येऊन पडली. त्यातच या ४३ वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली. या बाधेतून बुरशीच्या म्युकोरमायकोसिस आजाराची देखील लागण झाली. परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला २१ मे रोजी दाखल करण्यात आले.

म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान झाले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक ७ मध्ये ठेवण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी ८ विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी १८ जणांची टीम बनवली. गुरुवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी महिलेला शस्त्रक्रिया विभागात घेण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
म्युकोरमायकोसिसच्या या पहिल्याच शस्त्रक्रियेत या ४३ वर्षीय महिलेचा वरचा जबड्याच्या भागावर शस्त्रक्रिया करून काळी बुरशी काढून टाकण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच हि शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. महिलेला द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, नेत्रशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. प्रसन्ना पाटील, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपीन खडसे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाथी एम., डॉ. काजल साळुंखे, डॉ. स्वप्नील इंकणे, डॉ. अनिल पाटील, अधिपरिचारिका माधुरी महाजन, ज्योत्स्ना निंबाळकर, नजमा शेख यांनी सहभाग घेतला. शास्त्रक्रियेनंतर तपासणीसाठी नमुने सूक्ष्मजीवशास्त्र व विकृतीशास्त्र विभागात पाठविण्यात आले आहे. महिलेला अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शस्त्रक्रिया झाल्यावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विजय गायकवाड यांनी भेट देऊन महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. शस्त्रक्रीयेचा वैद्यकीय खर्च हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे शस्त्रक्रिया हि विनामूल्य झाली आहे. जळगावचे हे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय आता अद्ययावत झाले असून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करीत असल्याची प्रतिक्रीया डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here