गेल्या वर्षी मे महिन्यात करोनाचे २ लाख रुग्ण होते. तर सीरो सर्वेमध्ये १७ लाख नागरिकांना संसर्ग झाल्याचं बोललं जातंय. सीरो सर्वेनुसार संसर्गाने होणाऱ्या मृत्यू दर हा ०.५ टक्के आहे. वास्तविस्त मृत्यू दर हा १.१ टक्के आहे, जे सरकार सांगतंय. आमचा आकडा आहे ०.०५ टक्के. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने आपल्या वृत्तात ०.०३ टक्के इतका आकडा दिला आहे. मग हे मृत्यू ६ पटीने अधिक आहेत का? असा सवाल करत केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चं वृत्त फेटाळून लावलं आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेलं वृत्त म्हणजे ५ जण कामाला लागले… फोन केले आणि त्यातून हे वृत्त तयार केले गेले, असं डॉ. व्ही. के. पॉल ( ) म्हणाले.
मृतांच्या संख्येची माहिती उशिराने दिली जाऊ शकते. पण नोंदणीतून ते समोर येईलच. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने आपल्या वृत्ता मृत्युंची संख्याही १२ पटीने वाढवली आहे. हे वृत्त काही विकृतांनी मिळून निव्वळ अंदाजाच्या आधारावर तयार केले आहे, असा सणसणीत टोलाही डॉ. व्ही. के. पॉल यांनी लागवला. नाव न घेता व्ही. के. पॉल यांनी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला सुनावलं. इवढ्या प्रतिष्ठीत वृत्तपत्रात अशा प्रकारचे निराधार आणि खोटे वृत्त छापायला नको होतं. आम्ही हे वृत्त फेटाळून लावतो, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times