मुंबईः शोले, शान, सीता और गीता आणि सागर सारख्या बहारदार चित्रपटांचे दिग्दर्शक यांचा आज जीवनगौरव पुरस्कारने सन्मान करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल फिल्मफेअरने रमेश सिप्पी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला. अभिनेता अक्षय कुमारच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

८० च्या दहशकात रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा बोलबाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला. शोले, शान, अंदाज, शक्ती हे चित्रपट हिट ठरले. अजूनही त्यांचे दिग्दर्शनाचे काम सुरू आहे. २०१४मध्ये त्यांचा सोनाली केबल, २०१३मध्ये नौटंकी साला हे चित्रपट आले. या महान दिग्दर्शकाचा फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. केंद्र सरकारने २०१३मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

या सोहळ्यात ‘गली बॉय’ आणि ‘कबीर सिंह’ या चित्रपटांना बेस्ट म्युझीक अल्बमचा पुरस्कार देण्यात आला.

६५ व्या अॅमेझॉन सोहळ्याचे वाचा अपडेड्ट –

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here