मुंबई : करोनाच्या भीषण काळात अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. अनेक लहान बालक अनाथ झाली. यामुळेच नागपुरातील सिद्धिविनायक सेवा ट्रस्टमध्ये पहिल्या दिवशी नोंदणी झालेल्या १०० मुलांचं पालकत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्तरावर त्यांचं कौतूक करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टमध्ये ‘सोबत’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आपण १०० मुलांचं पालकत्व स्किकारत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयामुळे त्यांनी अनेकांची मन जिंकली आहे. खरंतर, करोनाच्या भीषण संकटामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक बालकं अनाथ झाली. अनेकांच्या डोक्यावरची माता-पिताची छाया गेली. अशा बालकांसाठी नागपूरमध्ये सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट काम करत असून अनाथांसाठी सेवा देत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या संपूर्ण कार्यामध्ये काहीपण मदत लागली तरी त्यासाठी मी तयार आहे. १०० बालकांची नोंद झाली आहे, त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो. त्यासाठी सगळी व्यवस्था तुम्ही करा पण सगळं पाठबळ मी देईन. तर दक्षिण-पच्छिम नागपूरातही लागणारी सगळी मदत मी करण्यासाठी तयार’ असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here