बुलडाणा: हुशारीनं ओळख करून सलगी वाढवल्यानंतर तरुणाला पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या व आत्महत्येसाठी भाग पाडणाऱ्या एका विधवा शिक्षिकेला जलंब पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (Teacher Arrested for Abetting Suicide)

प्रभूदास बोळे असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव आहे. तो तालुक्यातील पहुरजीरा येथे राहत होता. सुटाळा येथे आपल्या दोन मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने प्रभूदास यांच्यासोबत ओळख करून घेतली. त्यानंतर ती बोळे यांना व्हिडिओ कॉल करायची. त्यांच्यासोबत ऑनलाइन चॅटिंग करायची. घरी सुद्धा यायची. काही दिवसानंतर या शिक्षिकेने बोळे यांच्याकडं फ्लॅट घेण्यासाठी पैशाची मागणी सुरू केली. त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे ते वैतागून गेले होते. अखेर १६ मे रोजी रात्री विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर आठ दिवसांनी प्रभुदास यांची पत्नी वर्षा हिनं आपल्या पतीचा मोबाइल पाहिला. त्यात आरोपी शिक्षिकेने केलेले मेसेज तिला दिसले. ‘माझ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. मी विचारायला येईन. फोन स्वीच ऑफ करून काहीही होणार नाही. माझ्यात बदल होणार नाही,’ असे मॅसेज होते.

वाचा:

वर्षा बोळे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. ही शिक्षिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आत्महत्या करत आहे, असा मेसेज आत्महत्येपूर्वी बोळे यांनी मला पाठवला होता, असंही वर्षा यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली. आरोपी शिक्षिका पैशासाठी तगादा लावत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिला अटक केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here