पुणे : पुण्यात पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून त्यापोटी १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २० मे २०२१ रोजी उघडकीस आला.

नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय-४२, रा. भोसरी) याच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय-३८, रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) याला अटक केली आहे. तर, रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय-४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ (वय-३७) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मूळ मालक नसताना लांडगे यांनी परस्पर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ठाकूरचा शोध पोलीस घेत आहेत. लांडगे प्रथमच पालिकेवर निवडून आले असून, त्यांनी शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here