अहमदनगर: ‘कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोधच आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात या प्रकल्पासंबंधी जी जाहिरात प्रसिद्ध झाली, तो त्या वृत्तपत्राच्या उत्पन्नाचा भाग आहे,’ असे स्पष्टीकरण राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिले आहे.

अनिल परब आज शिर्डीत आले होते. साई समाधीच्या दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. परिवहन विभागाच्या कामाबद्दल ते म्हणाले, राज्यात पन्नास नवीन एसटी डेपो देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. प्रत्येक तीर्थस्थळावर एसटी डेपो उभारण्यात येणार आहे. त्याची सुरुवात त्र्यंबकेश्वरपासून करण्यात आली. शिवशाही बसच्या वाढत्या अपघातांची कारणे शोधण्यात येत आहेत. खासगी कंत्राटदाराद्वारे ही सेवा चालविण्यात येत आहे. त्यातून एसटीचा किती फायदा झाला आहे, याचा आढावा घेण्यात येत आहे. त्यासोबतच ही सेवा स्वत: एसटी महामंडळानेच चालविली तर काय फरक पडले, याचाही चाचपणी सुरू असून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.’

नेमकी जाहिरात काय?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’त नाणार प्रकल्पाची भलामण करणारी जाहिरात आली आहे. या जाहिरातीत नाणार प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होऊन कसा फायदा होणार हे सांगण्यात आलं आहे. कोकणात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांबाबत या जाहिरातीत भाष्य करण्यात आलं आहे. हा प्रकल्प उभारल्यानंतर कोकणातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार असून २० हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल, कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ ही टॅगलाइनही या जाहिरातीत देण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाची पाठराखण करणाऱ्या या जाहिरातीमुळे कोकणवासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शिवसेनेना फसवणूक करत असल्याची भावना कोकणवासियांमध्ये निर्माण झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Ah yes, this is exactly the article I was looking for. I’ve been looking for the information you provided for days. I wish you continued success

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here