लॉकडाउनच्या काळात अन्य दुकाने बंद आणि दारू विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ नगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे यांनी हे आंदोलन केले.
वाचा:
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच ठाकरे यांनी याच्या उलटी भूमिका घेतली होती. त्यावेळीही दारूची दुकाने बंद होती. तेव्हा ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ती सुरू करण्याची मागणी केली होती. ‘ व लॉकडाऊनमुळं निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी वाईन शॉप्स सुरू करून पाहावे. त्यातून राज्याचा बुडालेला महसूल मिळू शकतो. ‘वाईन शॉप्स’ सुरू करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही. राज्यात आधीपासून असलेली दारूबंदी उठवा असं आमचं म्हणणं नाही. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असं राज यांनी पत्रात म्हटलं होतं. एकूणच त्यावेळी ठाकरे दारू विक्रेते आणि हॉटेलचालकांच्या बाजूने उभे राहिल्याची टीकाही झाली होती.
वाचा:
वर्षभरानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याच्या उलट मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका कोणती, असा प्रश्न निर्माण होत आहे. नगरमध्ये आंदोलन का केले, यासंबंधी भुतारे यांनी सांगितले की, ‘करोनामुळे सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प आहेत. बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून लोकांकडे दारू घ्यायला सुद्धा पैसे राहिले नाहीत. अशाही परिस्थितीत सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. बाकीचे व्यवहार ठप्प, ज्यांना मदत जाहीर केली, त्यांना ती मिळत नाही अशा परिस्थितीत सरकार मात्र दारूला परवानगी देत आहे. अशा दारू प्रेमी सरकारचा आम्ही दारूचा अभिषेक करून निषेध केला आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा मनसेच्या वतीने येणाऱ्या काळात रास्तारोको आणि अन्य प्रकारचे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भुतारे यांनी दिला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times