मिळालेल्या माहितीनुसार, सासरी छळ होत असल्यामुळे विवाहितेने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. पूजा गणेश रायकर (वय 21) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पूजाला वारंवार सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता.
लग्न झाल्यानंतर मुल होत नाही म्हणून पूजाचा छळ सुरू होता. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी कार घेण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली. पण माहेरची परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे पैसे आणले नाही म्हणून तिचा छळ करण्यात आलं.
पुढे हाच त्रास वाढत गेला. तिला रोज मारहाण करणं, उपाशी ठेवणं अशा सगळ्या जाचामुळे पूजाने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. १९ तारखेला तिने सॅनिटायझर प्यायला त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर २६ तारखेला तिचा मृत्यू झाला.
यानंतर सगळ्यात धक्कादायक म्हणजे पूजाचा मृत्यू झाल्यानंतर कोणालाही याबाबत कळू नये म्हणून तिच्या सासरच्यांनी तिला करोना झाला असल्याच खोटा अहवाल तयार केला, पण शवविच्छेदनात सत्य समोर आल्यानंतर सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times