मुंबई: भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना (Jalna) सरचिटणीस शिवराज नारियलवाले (Shivraj Nariyalwale) यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळं भाजपमध्ये तीव्र संताप आहे. विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘शिवराज यांचा कुठलाही गुन्हा नसताना त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

वाचा:

शिवराज नारियलवाले यांना मागील महिन्यात जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळं पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रात मांडून पोलिसांच्या वर्तनाकडं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘शिवराज हे ९ एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा तिथं अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं तिथं काही लोक धुडघूस घालत होते. त्यावेळी तिथं उपस्थित काही पोलिस हे गवळी समाजाबद्दल शिवीगाळ करीत होते. शिवराज यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केली. त्याचा राग धरून पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली. गणवेशातील सहा आणि गणवेशात नसलेले दोन असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानुष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘रुग्णालयात धुडगूस घालणार्‍या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे. नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई करता आली असती. पण, सराईत गुन्हेगारापेक्षाही भयंकर पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिविगाळीचा व्हीडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात लाच घेताना निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचा:

‘कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे राज्यात घटना घडत असताना सरकार मौन आहे. सरकारविरोधात सामान्य माणसानं प्रतिक्रिया दिली तरी त्यांना मारहाण होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here