‘राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
पुण्यात पॉझिटिव्हीटीचे प्रमाण ११.९ टक्के आहे. पुण्यातील प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रमाण नऊ टक्क्यांपर्यंत येईल, असा अंदाज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.
इतर जिल्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा
राजेश टोपे यांनी राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची स्थिती नेमकी काय असेल, याबाबतही भाष्य केलं आहे. ‘पॉझिटिव्हीटीचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून शिथिलता दिली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर आदेश १ जून रोजी काढले जातील,’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील निर्णयाबाबत महापौर काय म्हणाले?
‘पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल,’ अशी प्रतिक्रिया पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times