पुणे: सर्वजण झोपेत असताना हे सरकार जाईल असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. पाटील यांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री (Jayant Patil) यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना स्वप्न पाहण्याचा छंद असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही, असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे. ( jayant patil criticizes )

जयंत पाटील हे पुण्यात साखर कारखान्याशी संबंधित विषयावर आयोजित एका बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. अशा प्रकारची वक्तव्ये चंद्रकांत पाटील नेहमीच करत असतात. सर्वजण झोपेत असताना सरकार पडेल अशी भविष्यवाणीच त्यांनी केली होती. आता त्यांना स्पप्न पाहण्याचा धंद असेल तर त्यावर मी काय बोलणार, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिम्मत दाखवावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या आवाहनालाही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशात करोना संसर्गाची स्थिती चिंताजनक असल्याने केंद्राने अधिेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही याचे कारण सर्वांनाच माहीत आहे. केंद्राचा नियम हा प्रत्येकालाच लागू होतो. म्हणूनच राज्य सरकार अधिवेशन घेत नसल्याचे पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

‘लॉकडाउनबाबत निर्णय मुख्यमंत्री घेणार’

राज्यात सुरू असलेला लॉकडाउन वाढवायचा का हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील परिस्थिती पाहून घेतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. करोनाचा पॉझिटिव्हीटीचा दर जरी खाली घसरला असला तरी देखील तो पूर्णपणे कमी झालेला नाही. यांमुळे करोनाचे संकट पूर्णपणे टळले असे म्हणता येत नसल्याचेही पाटील म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here