सोमवारी दुपारी साडे बारा वाजता या मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
मेट्रोच्या कामात करोना उद्रेकामुळे अडचणी येत आहेत. काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील कमी आहे. मात्र, असे असले तरी देखील याचा मेट्रोच्या कामावर परिणाम झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
या मेट्रो प्रकल्पाचे काम सन २०१६ मध्ये सुरू झाले. यंदा या कामाला ५ वर्षे पूर्ण होत असून यंदा हे काम पूर्ण होत आहे. या दोन्ही मेट्रो लाइन सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर या पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होणार आहे. सन २०३१ पर्यंत या मेट्रोद्वारे सुमारे १ कोटी प्रवासी प्रवास करणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ही ६ कोचची ट्रेन आहे. प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची बसण्याची, तर ३२८ प्रवाशांची उभे राहून प्रवास करण्याची व्यवस्था आहे. याचाच अर्थ मेट्रोच्या एका डब्यात एका वेळी ३८० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या एका ट्रेनची प्रवासी क्षमता २,२८० इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times