मुंबई: राज्यात आज गुरुवारी २० हजार ७४० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजही नव्या रुग्णांच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ४२४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. (maharashtra registered 20740 new cases in a day with 31671 patients recovered and 424 deaths today)

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ९२ हजार ९२० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १६.५७ इतके आहे. सध्या राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १६ हजार ०७८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच ज्यांच्याव उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ लाख ८९ हजार ०८८ इतकी आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्या २ लाख ८९ हजार ०८८

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ८९ हजार ०८८ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण ४२ हजार ५५० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २८ हजार ७९३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या २० हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या १४ हजार ५९३ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ७६७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये ११ हजार ५७८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ४ हजार ९३९, नांदेडमध्ये ही संख्या ३ हजार ८२८ इतकी आहे. जळगावमध्ये ६ हजार ५९१, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ४९० इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ५ हजार ९७२, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १७ हजार ९४६ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९१३ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here