अंबाझरी तलाव आणि व्हिएनआयटीच्या हिरवळीला लागून असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल विस्तारले आहे. अंबाझरीच्या बॅक वॉटर परिसरातील जैव विविधता उद्यानातून हा बिबट्या मानवी वस्तीत शिरला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. भर वस्तीत शुक्रवारी सकाळी हा बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.
ज्या ठिकाणी हा बिबट्या दिसला तो परिसरही झुडपी जंगलाचा आहे. पॉवर इंजिनिअरिंगचे कॉलेज असलेला हा परिसर लॉकडाऊनमुळे सध्या निर्मनुष्य असल्यासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे या कंपन्यांमधील कर्मचारी घरूनच काम करतात.
अशातच शुक्रवारी लोकवस्तीच्या या भागात बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाल्याने वनविभाग आणि ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटरची टीम बिबट्याच्या पाऊलखुणा शोधत आहे. तेथील एका पत्र्याच्या टीनवर बिबट्याच्या पावलासदृष्य खुणा आढळल्या आहेत. त्याचाही वन विभागाची टीम मागोवा घेत आहे. या पाऊलखुणा बिबट्याच्याच आहेत, का हे देखील तपासले जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times