नव्याने ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आलेल्या ४२ जणांपैकी सर्वाधिक २७ रुग्ण हे एकट्या जिल्ह्यातील आहेत. त्या सोबतच विभागातील अन्य जिल्ह्यांपैकी चंद्रपुरात ८, वर्धेत ४, भंडारात २, आणि गोंदियात १ अशा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे विभागात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आलेल्यांची संख्या ११५६ पर्यंत धडकली आहे.
एकट्या नागपुरात ब्लॅक फंगसचे निदान झालेल्या २७ जणांपैकी १८ रुग्णांवर खासगी दवाखान्यांमध्ये तर ९ जणांवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. रुग्णालयात भरती एकूण रुग्णांपैकी शुक्रवारी विभागात ब्लॅक फंगसवर उपचार घेत असलेल्या १९ जणांवर शल्यक्रिया करण्यात आल्या.
क्लिक करा आणि वाचा-
आतापर्यंत ब्लॅक फंगसचे ८२ मृत्यू
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ब्लॅक फंगसचे निदान झाल्यानंतर सुरू असलेल्या उपचारादरम्यान विभागात ८२ जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. त्यातील काळ्या बुरशीचे निदान झाल्यानंतर एकट्या नागपुरात ७७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गोंदियातीलल ३ आणि चंद्रपुरातील १ जण उपचारादरम्यान दगावला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times