उल्हासनगर: नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्याअसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही घटना आज रात्री ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (five people lost lives when a in )

साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंतचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना वाचवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम रवाना झाली आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here