म. टा. प्रतिनिधी मुंबई

मुंबई महापालिकेने लसीकरणाबाबत (Vaccination) काही नवे बदल केले असून ही सुधारित नियमावली शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून कस्तुरबा, राजावाडी आणि कुपर रुग्णालयात जाऊन लस घेता येणार आहे. लस घेताना विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठ प्रवेश निश्चिती पत्र, व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म ही कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. ( from Monday for students going abroad)

पंचेचाळीस वर्षांवरील तसेच ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, इतर कर्मचार्यांमध्ये कोव्हिशिल्ड दुसरा डोस घेणारे, प्रसुती होऊन एक वर्ष झालेल्या स्तनदा माता यांना आता सोमवार, मंगळवार, बुधवारी घराजवळच्या केंद्रांवर नोंदणी न करता थेट जाऊन पहिला आणि दुसरा डोस घेता येणार आहे.

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील या आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ६० वर्षे व अधिक वयोगटातील अंदाजित ११ लाख लोकसंख्येपैकी ८ लाख ५३ हजार एवढ्या लाभार्थ्यांना कोविड-१९ लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
त्याचप्रमाणे ६० वर्षे व अधिक वयोगटातील नागरिकांसाठी पहिल्या मात्रेसाठी थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेण्याकरता सुविधा उपलब्ध केलेली होती. या सुविधेच्या अनुषंगाने प्रतिदिन सरासरी केवळ ७००० लाभार्थी लाभ घेत होते. परंतु ४५ वर्षे व अधिक वयोगटातील १९ लाख नागरिकांपैकी पहिल्या मात्रेकरता साधारण ९ लाख नागरिक प्रतीक्षेत आहेत. तसेच ६० वर्षे व अधिक वयोगटातील नागरिकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता ४५ वर्षे व अधिक लससाठा आणि मनुष्यबळ तसेच साधनसामुग्री यांचा पुरेपूर वापर होईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० टक्के लसीकरण हे कोविन अॅपवर नोंदणी तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच केले जाणार आहे. तसेच रविवारी लसीकरण कार्यक्रम बंद असणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here