वाचा:
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असे आपण सांगितले. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
वाचा:
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुका केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे. समाजातील सामान्य माणसाच्या या विषयात भावना तीव्र आहेत, याची अजित पवार यांनी दखल घ्यावी आणि अशी कुचेष्टा करू नये असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानंतर त्यावर अजित पवार यांनी टोला हाणला होता. पुण्यात पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याकडे लक्ष वेधले असता, ‘मी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हेदेखील मराठा समाजाचे आहोत. त्यामुळे आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल’, अशी शेरेबाजी पवार यांनी केली होती. त्यावरूनच पाटील यांनी पलटवार केला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times