नवी दिल्लीः दिल्लीहून अमेरिकेसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ ( ) आढळल्याने एकच गोंधळ उडाला. एअर इंडियाच्या ( ) फ्लाइट नंबर AI-105 या विमानाने शुक्रवारी २.२० मिनिटांनी दिल्लीहून अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण केले. विमनाने उड्डाण घेतल्या जवळपास ३० मिनिटांनी पॅसेंजर एरियात म्हणजे केबिनमध्ये वटवाघूळ आढळून आले. यामुळे हे विमान माघारी फिरवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शुक्रवारच्या पहाटे ३.५५ मिनिटांनी या विमानाचे दिल्ली विमानतळार इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. यानंतर वन विभागाच्या पथकाने विमानातून मेलेले वटवाघूळ बाहेर काढले.

एअर इंडियाचे बोइंग 777-ER हे विमान दिल्ली – न्यूजर्सी दरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते. ‘DEL-EWR AI-105 फ्लाइटसाठी दिल्ली विमानतळावर लोकल स्टँडबाय इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. विमानताळवर विमान लँड झाल्यावर क्रूने केबिनमध्ये वटवाघूळ असल्याची माहिती दिली, असं एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

उड्डाण घेतल्याच्या जवळपास आर्ध्या तासाने विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात वटवाघूळ असल्याची माहिती दिली. यानंतर इमर्जन्सी घोषित करून विमाना माघारी फिरवण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली. पण वटवाघूळ कुठेच सापडले नाही. यानंतर वन्यजीव तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. त्यांनी विमानात धूर केला. यानंतर वटवाघूळ आढळले. पण तोपर्यंत ते मेलेले होते.

DGCA ने दिले चौकशीचे आदेश

घटनेची माहिती मिळात डायरेस्टर जनरल ऑफ सिविल एव्हिएशनने (DGCA) चौकशीचे आदेश दिलेत. एयर इंडिया चे B777-300ER हे विमान दिल्ली – न्यूजर्सी प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाते. याचा नोंदणी क्रमांक VT-ALM हा आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणी ग्राउंड सर्विस स्टाफचा निष्काळजीपणा समोर आला आहे. प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानाची पूर्ण तपासणी केली जाते. सर्वकाही ठीक असल्यावरच उड्डाणाला परवानगी दिली जाते.

दिल्ली – न्यूजर्सी या एअर इंडियाच्या विमानात किती प्रवासी होते? याची माहिती मिळालेली नाही. पण B-777 ER या विमानातून ३४४ प्रवासी प्रवास करू शकतात.

केटरींगच्या गाडीतून आल्याची शक्यता

विमानात वटवाघूळ येण्यास केटरिंग व्हेइकल जबाबदार असू शकतं, असा अंदाज एअर इंडियाच्या इंजीनिअरिंग सर्व्हिसने प्राथमिक अहवालात दिला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये प्रवाशांना जेवण दिलं जातं. हे जेवण बेस किचनमधून तयार होऊन येतं. ते विमानात लोड केलं जातं. यापूर्वीही अशा व्हेइकलमध्ये उंदीर किंवा इतर छोटे जीव आढळून आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here