भरत नगर आणि सिताबर्डी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. अमरावती मार्गावरील भरत नगरातल्या निवासी परिसरात हवेली नावाचा हुक्कापार्लर बेधडकपणे सुरू होता. येथे तरुण मुले मोठ्या प्रमाणात हुक्का पार्टी करतात अशी खबर अंबााझरी पोलिसांना मिळाली. पोलिसांची टीम तडक हुक्कापार्लवर पोचली असता तिथे ११ जण हुक्क्याचा दम मारताना पोलिसांना दिसले. कॅफेच्या नावाखाली हा सुरू होता. पोलिसांनी या हुक्का पार्लरचा मालक प्रेम जोरणकर (रा. कोराडी रोड), प्रीतम यादव ( रा. मानकापूर), हुक्का पार्लरवर काम करणारे 2 नोकर आणि अन्य ७ तरुणांवर कारवाई केली. मादक द्रव्य कायद्यासह वेगवेगळ्या कलमांतर्गत त्यांच्याववर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्याच वेळी पोलिस उपायुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सिताबर्डी पोलिसांनीही फ्युजन नावाने चालविल्या जात असलेल्या आणखी एका हुक्का पार्लरवर कारवाई करीत बेकायदेशीर हुक्का ओढणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही हुक्का पार्लरवर मिळून पोलिसांनी तब्बल २२ तरुणांवर कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सरकारने यापूर्वीच हुक्का ओढण्यावर कायदेशीर बंदी घातली आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्यात लॉकडाऊन असताना विषाणूची भिती पाहता सार्वजनिक ठिकाणी धुम्रपाावरही कायदेशीर बंदी आहे. या दोन्ही कायद्यांना झुगारून गर्दी केल्या प्रकरणी पोलिसांनी साथ रोग प्रतिबंधक कलमाखालीही या तरुणांवरगुन्हे दाखल केले आहेत. उशीरा रात्री पर्यंत ही कारवाई सुरू होती.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times