नवी दिल्लीः करोना रुग्णांवरील उपचारासाठी डीआरडिओने (DRDO) विकसित केलेल्या औषधाची (sachet) किंमत ९९० रुपये आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. ओरल ड्रग ‘2-deoxy-D-glucose’ किंवा 2-DG हे डीआरडीची एक लॅबोरेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ न्यक्लिअर मेडिसीन आणि एलाइड सान्सेसने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या सहकार्यातून तयार केले आहे. देश करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना देशच्या ड्रग कंट्रोलरकडून या महिन्याच्या सुरवातीला या औषधाच्या ( ) वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

हे औषध पाउडर फॉर्म म्हणजे एका sachet मध्ये येतं. पाण्यास मिसळून ते घ्यायचं आहे. डीआरडीओच्या 2-DG अँटी कोविड औषधाची म्हणजे एक sachet ची किंमत ही ९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या म्हणजे सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये हे औषध डिस्काउंट रेटवर म्हणजे औषधावर सूट दिली जाईल, असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यातील जवान, ज्येष्ठ आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गुरुवारी एक वेबसाइट लाँच केली. डीआरडीओच्या 2-DG औषधाचे निष्कर्ष चांगले आले आहेत. या औषधाचे १० हजार sachet बाजारात विक्रीसाठी येत असल्याने आपल्याला आनंद आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

डीआरडीओचे 2-DG औषध हे गंभीर आणि चिंताजनक प्रकृती बनलेल्या रुग्णांसाठीही उपयोगी ठरणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाला मंजुरी मिळाली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना लवकर बरे करण्यात हे औषध उपयोगी आणि रुग्णाला असलेली ऑक्सिजनची गरज दूर करते. हे औषध घेतल्यानंतर मोठ्या संख्येत रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळून आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here