वाचा:
सातारा जिल्ह्यातील करोन स्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आले होते. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ते पोहचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठमोठे पुष्पगुच्छ घेऊन आधीपासूनच उभे होते. अजित पवार बऱ्याच दिवसांनी साताऱ्यात आल्यामुळे या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पण कोविडचे निर्बंध असताना अशी गर्दी करणे अजित पवार यांना रुचले नाही आणि मग त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. “तुमच्या साताऱ्यात सर्वात जास्त करोना आहे आणि तुम्ही काय बुके घेऊन आलाय. चला लांब लांब व्हा”, असे म्हणत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये कार्यकर्त्यांना खडसावले व समजही दिली.
वाचा:
‘मला माहीत आहे तुमचे राष्ट्रवादीवर, पवार साहेबांवर आणि आमच्यावर विशेष प्रेम आहे, मात्र आताची परिस्थिती तुम्हीच लक्षात घ्या. तुम्ही नियम पाळत नाही. आम्ही तुम्हाला सारखं सारखं नियम पाळायला सांगत बसायचं का? तुम्हाला बोललं की राग येतो…’, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ‘दादा तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे’, असे कार्यकर्ते म्हणाले. मग ‘अरे बाबा, काहीतरी नियम पाळा ना. तुम्ही कोणाकडून पुष्पगुच्छ आणलाय, ज्याच्याकडून तो आणला त्याला करोना झाला असेल किंवा नाही, काय माहीत?’, असे अजित पवार म्हणताच कार्यकर्तेही काहीशे गडबडले. त्यानंतर अजित पवार यांनी काही बुके स्वीकारले व आता उरलेले बुके इतरांना द्या असे ते म्हणाले. दादांनी बुकेसुद्धा स्वीकारले नाहीत असे म्हणाल म्हणून मी हे बुके स्वीकारतो पण यापुढे काळजी घ्या, असे सांगून अजित पवार बैठकीसाठी मार्गस्थ झाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times