नागपूर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असतानाच नागपुरात पेट्रोलने प्रतिलिटर शंभर रुपयांचा दर गाठला आहे. आजपासून (शनिवार) हे दर लागू होतील. मुख्य म्हणजे आजवरचा इतिहास पाहता उपराजधानीत पहिल्यांदाच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. ( )

वाचा:

शंभरी गाठणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या. राज्यातील काही शहरांमध्ये यापूर्वीच पेट्रोलने प्रतिलिटर शंभरचा आकडा पार केला आहे. त्यानंतर आजपासून पेट्रोलचे नवीन दर लागू झाले आहेत. त्यानुसार नागपुरातही प्रतिलिटरसाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. काळातील ही दरवाढ सामान्यांची चिंता वाढविणारी ठरणार आहे. या काळात पेट्रोलची विक्रीदेखील कमी झाली आहे. अशा स्थितीत सुरू असलेली दरवाढ नेमकी कुणाच्या हितासाठी, असादेखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

वाचा:

पेट्रोलियम डीलर्सच्या मते, ही दरवाढ पूर्णत: राजकीय आहे. दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीचा कुठलाही परिणाम नाही. आठवड्याभरापासून ९९ रुपयांच्या घरात खेळणाऱ्या पेट्रोलने शुक्रवारी काही पैसे पुढे सरकत ९९.७५ रुपयांवर मजल मारली. सध्या असल्याने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ तुलनेने कमी आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या पूर्वीसारखी नाही. पेट्रोलविक्रीदेखील घटली आहे. अशा स्थितीत ही दरवाढ सुरू आहे.

अशी राहिली दरवाढ

तारीख-पेट्रोल दर
१९ मे- ९८.९६ रुपये
२० मे- ९८.९६ रुपये
२१ मे- ९९.१४ रुपये
२२ मे- ९९.१४ रुपये
२३ मे- ९९.३ रुपये
२४ मे- ९९.३ रुपये
२५ मे- ९९.५२ रुपये
२६ मे- ९९.५२ रुपये
२७ मे- ९९.७५ रुपये
२८ मे- ९९.७५
२९ मे- १०० रुपये

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here