केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या बदलीचे ( west bengal chief secretary alapan bandyopadhyay ) पत्र जारी केले आहे. १९८७ च्या कॅडरचे आयएएस अलप्पन बंडोपाध्याय यांना तात्काळ भारत सरकारच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएस नियम १९५४ च्या ६ (१) नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारने बंडोपाध्याय यांना तात्काळ सेवामुक्त करावं असं आवाहन केंद्र सरकार करत आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रवादळाने झालेल्या नुकसानीही हवाई पाहणी केली. यानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठका घेतल्या. पण पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना आर्धा तास वाट बघायला लावली. एवढचं नव्हे तर त्यांनी नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला आणि काही मिनिटांत त्या तिथून निघून गेल्या, असं केंद्रातील सूत्रांनी सांगितलं. यावरून मोठा वाद झाला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांच्या तडकाफडकी बदलीवरून तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. एखाद्या राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी भाग पाडलं जात आहे. हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं कधी घडलंय का? मोदी-शहांच्या नेतृत्वात भाजप किती खालची पातळी गाठेल? बंगालच्या जनतेने भाजपला धडा शिकवून ममतांना बहुमत दिले. यामुळे हे सर्वकाही होत आहे, असा आरोप रॉय यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times