ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दोन ट्वीट केले. देश करोना संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थिती तातडीची आर्थिक मदत मागून आम्हाला केंद्र सरकावर कुठलाही बोजा टाकायचा नाहीए. आम्ही आपल्या संसाधनांच्या माध्यमातून या संकटातही व्यवस्था करू, असं पटनायक म्हणाले.
पंतप्रधान मोदींसोबतच्या आढावा बैठकीनंतर स्टेट रिलीफ कमिश्नर प्रदीप जेना यांनीही हीच माहिती दिली. आम्ही आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींकडे कुठल्याही आर्थिक मदतीची किंवा पॅकेजची मागणी केली नाही. पण राज्यासाठी शक्तीशाली आपत्ती निवारण यंत्रणा आणि किनारपट्टीच्या भागांची वादळापासून सुरक्षा, या दोन मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यास चक्रीवादळामुळे ४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २१ लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.
ओडिशाने कुठल्याही आर्थिक पॅकेजची मागणी केली नसली तरी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारकडून ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे. यासह पश्चिम बंगाल आणि झारखंडला मिळून ५०० कोटींची मदत जाहीर केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५० हजारांची मदतही जाहीर केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times