कोल्हापूर: मी एकाच वेळी आठ-आठ खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे मला शिकवू नका… निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्याही क्षणी घेऊ शकता, त्यामुळे हिंमत असेल तर दोन दिवसात विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा,असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सरकारला दिले आहे. ( )

वाचा:

एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे…अशा घोषणा देत कोल्हापुरातील सकल समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात विविध नेत्यांसह कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, ओबीसी समाजाला मिळणाऱ्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात यासह विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याची दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

वाचा:

या आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, प्रश्नी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. अजूनही राज्याने ती का केली नाही, हे कळत नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन करा म्हणून मागणी करूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. निर्णय घ्यायची इच्छा असेल तर कोणत्याही क्षणी निर्णय घेता येतो पण निर्णय घ्यायची इच्छा या सरकारमध्ये दिसत नाही. मी आठ आठ खाती एकावेळी सांभाळली आहेत. त्यामुळे मला निर्णय घेण्याबाबत शिकवू नका, असा टोला मारताना ते म्हणाले, सरकारमध्ये हिंमत असल्यास अधिवेशनाची तारीख दोन दिवसात जाहीर करावी.

वाचा:

दरम्यान, शिवाजी चौकात झालेल्या या आंदोलनात आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, महानगराध्यक्ष राहुल चिकोडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here