न्यूयॉर्क: भारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. भारतातील उद्रेकाचा फटका जगातील लसीकरण मोहिमेलाही बसला आहे. भारतामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सुमारे १९ कोटी लशींचा तुटवडा झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), युनिसेफ, गावी आणि ‘सीईपीआय’ या संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

या संघटनांच्या प्रमुखांनी एकत्रित निवेदन प्रसिद्ध केले आहे. जगातील सर्व देशांना समान लशींचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने ‘कोव्हॅक्स’ या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, त्यातून हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. लसीकरणामध्ये आघाडीवर असणाऱ्या देशांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. तसेच, परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे. मात्र, जगाच्या अन्य भागातील परिस्थिती फारच भीषण असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. दक्षिण आशियामध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर, लशींच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. तसेच, १२६ देशांना आतापर्यंत सात कोटी लशी देण्यात आल्या आहेत. मात्र, भारतातील उद्रेकामुळे जून अखेरपर्यंत या नियोजनातील १९ कोटी लशींचा तुटवडा भासणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

भारतातील उद्रेकानंतर जगातील लसीकरण ाच्या कार्यक्रमावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये अनेक देशांमध्ये करोना योद्ध्यांना दुसरा डोस मिळणेही कठीण झाले आहे, असे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय मदत संस्थेचे प्रशासक समंथ पॉवर यांनी म्हटले आहे.

वाचा:

‘कोवॅक्स’ काय आहे?

जगभरात लशींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोवॅक्स केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे. करोनाविरोधातील लशीकरण मोहिमेतून गरीब, विकसनशील देश वंचित राहू नये यासाठी कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली आहे. कोवॅक्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील ६० टक्के बालकांसाठी लसीकरण मोहीम राबवणारी GAVIसह सार्वजनिक-खासगी संस्था आदींचा सहभाग आहे. GAVI या संस्थेला बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे.

वाचा:

लशींच्या हक्कांविषयी अमेरिका सकारात्मक

करोना प्रतिबंधक लशीचे बौद्धिक संपदा हक्क आणि अन्य अत्यावश्यक पुरवठ्याच्या साखळी कार्यक्षम करण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य प्रतिनिधी कॅथरिन ताय यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी स्वागत केले. जयशंकर यांनी गुरुवारी ताय यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी दोन्ही देशांमधील व्यापाराच्या विस्तृत विषयांवर चर्चा केली. ही चर्चा अतिशय चांगल्या स्वरूपाची झाली, असे सांगून ताय यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत असल्याचे ट‌्विट जयशंकर यांनी केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here